सिरींज अभावी लसीकरण थांबल, पुणे पालिकेचा भोंगळ कारभार

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२.१०.२०२१.
पुणे अ दर्जाची पुणे महापालिका, जिचं बजेट ८. हजार कोटी आहे,भौगोलिकदृष्ट्या महापालिका मोठी आहे, आज तिच्याकडे सिरींज नसावी. त्या अभावी लसीकरण बंद पडणं निश्चित पुण्यातील सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या महापौर, चेअरमन, आणि सभागृह नेत्यांना याची कल्पना नव्हती का ?, असा सवाल जगताप, यांनी केलाय.
कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यांनी कोरोना लसी उपलब्ध होऊन केवळ सिरींज अभावी लसीकरण रखडणं ही पालिकेचा भोंगळ कारभार दाखवणारी घटना आहे, असं म्हटलंय. राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे १.५०. रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ?, असा सवाल प्रशांत जगताप, यांनी केला आहे.