मराठी
पुणे* *क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या चार आंतरराष्ट्रीय बुकीला पुण्यात अटक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२.१०.२०२१.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, यांनी आता सट्टेबाजांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्यां दोघा आंतरराष्ट्रीय बुकींना गुन्हे शाखेने रविवारी अटक केली, त्यांच्याकडून तब्बल ९३.लाख रुपयांचा रोकडसह साहित्य जप्त केले.
धनकवडीत एकजण ऑनलाईन लॉटरी सेंटर चालविताना सट्टा घेत असल्याची माहिती भारती विद्याीपीठ आणि सहकारनगर पोलिसांना मिळाली होती. ऑनलाईन आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या बुकीला भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलिसांनी अटक केली.