के के रेंजच्या माळरानावर लष्करा तर्फे सादर करण्यात आली युद्धाची प्रात्यक्षिके.
के.के. रेंज येथे दाखवण्यात आलेल्या युद्ध प्रात्यक्षिकांमध्ये 'टी-90' व 'टी-72' अजेय, एमबीटी अर्जुन ,बीएमपी 2, टॅंक वाहक मोटार, लढाऊ हेलिकॉप्टर यांचा समावेश होता. रणगाड्यांनी सोडलेल्या मिसाइलने लक्ष्यावर अचूक मारा करीत डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचे बंकर नष्ट केले.
अहमदनगर प्रतिनिधी (विलास गिर्हे ) :—
अहमदनगर मधील के.के. रेंजमध्ये दि १३ रोजी युद्ध सराव झाला. यानिमित्त लष्कराच्या ताकदीचे दर्शन उपस्थितांना झाले. भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या येथील मैकेनाईजड इन्फन्ट्री सेंटर अँड स्कूल यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी नेपाळचे लष्करी उपस्थित, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. युद्ध प्रात्यक्षिकांना सुरुवात करण्यापूर्वी सर्वांत प्रथम लष्कराकडे असणारे विविध रणगाडे, शस्त्रे यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर युद्ध सरावाला सुरुवात झाली. या वेळी शत्रूचा मुकाबला करण्यासाठी लष्कर कसे सज्ज आहे, याचा अनुभवच उपस्थितांना आला. रणगाड्यांमधून डागण्यात येणारे तोफगोळे, पायदळाचे चित्तथरारक युद्ध कौशल्य, आकाशात घिरट्या घालून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक मारा करणारी हेलिकॉप्टर, धुळीच्या लोटातून वाट काढतानाच लक्ष्याचा अचूक वेध घेत त्यांच्यावर तोफगोळे डागणारे रणगाडे, अशी प्रात्यक्षिके यानिमित्त दाखवण्यात आली.
के.के. रेंज येथे दाखवण्यात आलेल्या युद्ध प्रात्यक्षिकांमध्ये ‘टी-90’ व ‘टी-72’ अजेय, एमबीटी अर्जुन ,बीएमपी 2, टॅंक वाहक मोटार, लढाऊ हेलिकॉप्टर यांचा समावेश होता. रणगाड्यांनी सोडलेल्या मिसाइलने लक्ष्यावर अचूक मारा करीत डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचे बंकर नष्ट केले.
पायदळाच्या सूचनांवर बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करून शत्रूला उद्ध्वस्त करणारे आधुनिक तंज्ञत्रानयुक्त रणगाडे, त्यांच्या मदतीला हवाई हल्ले अन् जवानांची चढाई अशा वातावरणात के. के. रेंज परिसरात सुमारे दहा चौरस किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला. पायदळ, रणगाडाचालक यांचा नेमका समन्वय, चालत्या रणगाड्यातून शत्रूच्या हालचाली टिपत एकाच वेळी जमिनीवर केलेला अचूक मारा यातून भारतीय सैन्याची सज्जता, साहस आणि पराक्रमाचा प्रत्यय यावेळी आला. प्रारंभी पायदळाने शत्रूच्या दिशेने लपतछपत कूच करायची, शत्रू निशाण्यावर आल्यानंतर मागे असलेल्या रणगाडा सैन्याशी (सपोर्ट फायर) समन्वय साधून क्षेपणास्त्रांनी शत्रूचे अड्डे उद्ध्वस्त करायचे, गरज भासलीच तर हवाई हल्ल्यासाठी हेलिकॉप्टरही सज्ज होते असा युद्धाचा प्रत्यक्ष थरार पाहून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
बॉम्बचा बेछूट मारा करीत धुळीच्या लोटातून वाट काढणारे रणगाडे, शत्रूच्या बंकरचा अचूक वेध घेणारे मिसाइल, हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूवर तुटून पडणारे पायदळाचे जवान, ‘टी-90’ भीष्म, ‘टी- 72 अजेय’ आणि एमबीटी अर्जुन अशा विविध रणगाड्यांतून सुरू असणारा बॉम्बचा मारा…असा युद्धाचा थरार आज अहमदनगरपासून १५ किलोमीटरवरील के के रेंजच्या माळरानावर पाहण्यास मिळाला. ही युद्धाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांनी प्रात्यक्षिक झाल्यानंतर त्याचे सादरीकरण करणाऱ्या जवानांचे कौतुक केले.