मराठी
पिंपरी-चिंचवड* *महापालिकेच्या* *चिंचवड, गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची होते मोठ्या प्रमाणावर गैरसोय विद्युतदाहिनी सुरू करण्याविषयी उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, आणि महापालिका सह आयुक्त विकास ढाकणे, यांना दिले निवेदन.. सचिन निंबाळकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,६-१०-२०२१.
चिंचवड गावातील सर्व सामान्य नागरिकांना स्मशानभूमी साठी काळेवाडी, मध्ये जावे लागते याकरिता चिंचवड मध्ये लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम सुरू होण्यासाठी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सचिन निंबाळकर, यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.याविषयी लेखी निवेदन महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजित पवार, यांच्या स्विय सहाय्यक यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले. गेली २०. वर्षे सर्व अत्यंविधी हे काळेवाडी स्मशान भुमीत होतात चिंचवड गावात असलेली स्मशानभूमी २०००. साली बंद करण्यात आली.