पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भुखंड प्रकरणात माजी महसूल मंत्री मा.एकनाथ खडसे, यांच्या विरोधात पीएम एलए कोर्टाने बजावले समन्स गुरुवारी पर्यंत पीएम एलए कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,६-१०-२०२१.
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भुखंड प्रकरणात माजी महसूल मंत्री मा एकनाथ खडसे, यांच्या विरोधात पीएम एलए कोर्टाने समन्स बजावले आहे त्यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे, विशेष म्हणजे उपनिबंधक रविंद्र मुळें, यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, तर ईडीने दाखल केलेल्या चार्ज नीटच्या आधारे पीएम एलए कोर्टाने समन्स बजावला आहे,यामध्ये मंदा खडसे, यांना देखील चौकशी साठी समन्स देण्यात आले आहे. घटस्थापना अगोदर म्हणजे गुरुवारी पर्यंत न्यायालयासमोर हजर रहावे लागणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील वादग्रस्त भुखंड खरेदी प्रकरणात गिरीश यांच्या मागोमाग या व्यवहारात महत्वाची भूमिका असणारे तत्कालीन उपनिबंधक रविंद्र मुळें, यांना देखील अटक करण्यात आली होती.