पुण्यातील जहांगीर रुग्णालयाकडून किडनीग्रस्त रुग्णांची हेळसांड; आमदार मा.लक्ष्मण जगताप,यांची आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यांच्याकडे चौकशीची मागणी

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,५-१०-२०२१.
पिंपरी, चिंचवड व– पुणे शहरातील जहांगीर धर्मादाय रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना “आधी पैसे भरा, त्यानंतरच प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाईल, असे तेथील सर्जन डॉ. श्रीनिवास अंबिके, यांच्याकडून सांगितले जात आहे. पैसे न भरणाऱ्या रुग्णांवर उपचार नाकारले जात आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, धर्मादाय रुग्णालयांमार्फत होणाऱ्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाकरिता ठराविक दर निश्चित करून एक आदर्श नियमावली लागू करावी. तसेच राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा तातडीचा निर्णय घेऊन किडनी आजाराने ग्रस्त गोरगरीब रूग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार मा.लक्ष्मण जगताप, यांनी राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे, यांच्याकडे केली आहे.