मराठी
पिंपरी-चिंचवड* *महापालिकेच्या* *फुगेवाडी, येथील कै.मीनाताई बाळासाहेब ठाकरे, माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिंपरी युवासेनेकडून मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,५.१०.२०२१.
फुगेवाडी, शाळांची घंटा आज दिनांक,४.१०.२०२१.रोजी वाजली. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत युवा सेनेने मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले .
राज्यातील शाळा आज पासून सुरू झाल्या आहेत, ८. ते १२. चे वर्ग सुरू झालेले आहेत. फुगेवाडी येथील कै.मीनाताई बाळासाहेब ठाकरे, माध्यमिक विद्यालयात आज पिंपरी युवासेनेकडून विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले .
ह्या वेळेस सामाजिक कार्यकर्ते शिला मामी जाधव , रामभाऊ शिंगोटे , शिवाजी काची , भालेराव सर, व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके, यांनी केले .