ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा* *बोपखेल

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३.१०.२०२१.
विचार त्यांचे ऐकूया, अनुभव त्यांचा घेऊया,
प्रगती आपली करूया, आहेत ते जेष्ठ नागरिक सन्मान त्यांचा करूया…
शिवसेना शाखा बोपखेल वतीने जेष्ठ नागरिक दिन (१. आँक्टोंबर) च्या दिवशी बोपखेल गावातील जेष्ठ नागरिकांना घरोघरी जाऊन शुभेच्छा व आशिर्वाद घेण्यात आले. जेष्ठ नागरिकांमध्ये श्री.नामदेव गोगावले, (अध्यक्ष, हरी आओम जेष्ठ नागरिक संघ बोपखेल) यांच्या निवासस्थानी भेटून शिवसेना शाखेच्यावतीने ,,आरोग्य किट,, व तुळशीचे रोप भेट देण्यात आले. तसेच श्री. विठ्ठल महाराज घुले (विणेकरी), श्री.पाटीलबुवा घुले, श्री. काळेसाहेब, श्री. मारूती मोरे, मामा अशा अनेक जेष्ठांना निवासस्थानी जाऊन तुळशीचे रोपे भेट देण्यात आले यामागे तुळशी हि आरोग्य वर्धिनी म्हणून संबोधली जाते त्याच प्रमाणे सर्व जेष्ठांचे आरोग्य राहो हिच सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
उपस्थितांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून उपविभाग प्रमुख श्री.नामदेव घुले, श्री. रवि कोवे सर तसेच श्री. दत्तात्रय घुले, श्री. रोहिदास जोशी, श्री. दत्ताभाऊ घुले, श्री. मारूती मोरे, श्री. आबा वहिले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शिवसैनिक श्री. भाग्यदेव घुले, व शाखाप्रमुख श्री. संतोष गायकवाड, यांनी केले होते.