पुणे* *शासनाच्या विविध खात्यात दलित अधिकारी आणि कर्मचारी यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु अँड. भाई विवेक चव्हाण
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३-९-२०२१.
दलित अधिकारी आणि झोपडवपट्टी धारकांवर अन्याय केल्यास हटके पध्दतीने उत्तर दिल जाईल…
पुणे : शासनाच्या विविध खात्यात दलित अधिकारी आणि कर्मचारी यांना बदनाम करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम त्यांचे वरिष्ठ करत आहेत. तसेच बिल्डरांच्या हिताकरता शहरासह उपनगरातील झोपडापट्टी जबरदस्तीने हटविण्याचे काम महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडण्याकरता ‘दलित सन्मान मोर्चा’ काढण्यात आला. असल्याची माहिती भारतीय दलित कोब्राचे संस्थापक अॅड. भाई विवेक चव्हाण, यांनी दिल संचालक रविंद्र चव्हाण, निवृत्त अधिकारी नरेंद्र भगतकर, निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप वाघमारे, प्रा. डॉ. माधव गवई, राहुल डंबाळे, श्याम गायकवाड, सारिका बोरडे, गुलाब कांबळे, सचिन भालेराव, दत्ता पोळ, रितेश गायकवाड, स्वप्निल वाघमारे, राहूल बोरडे उपस्थित होते.