मराठी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे* *समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, यांना कारणे दाखवा नोटीस
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३-९-२०२१.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील महिला व मुलींना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून करोनाच्या काळात सर्व शाळा, आस्थापना बंद असतानाही शहरातील हजारो महिलांना प्रशिक्षण दिल्याचा दावा करत कोट्यवधी रुपयांची बिले संबंधित संस्थेने उकळली आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती काही नगरसेवकांनी मागविली होती महापालिकेत खळबळ उडाली होती. याची समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, यांना उपायुक्त अजय चारठाणकर, यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.