पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार … पोलिस घटनास्थळी दाखल
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, ५-६-२०२१.
पुण्यातील डुक्कर खिंड भागात एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. यात ४.ते ५.गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे. बांधकाम व्यवसायिक रवींद्र सांगुदे (वय ४१.) यांच्यावर झाला आहे. सुदैवाने यात ते जखमी झालेले नाहीत याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हे सकाळी साडे नऊ ते १०.वाजण्याच्या सुमारास डुक्कर खिंड परिसरातून जात होते. या दरम्यान दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांना अडविले. एकाने पिस्तूल रोखत त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले आहेत. नंतर देखील आणखी पुढे जाऊन त्यांच्या दिशेने गोळी झाडली असल्याची माहिती आहे.
हल्लेखोर पसार होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
लागलीच वरिष्ठ अधिकारी व वारजे माळवाडी पोलिसांनी धाव घेतली आहे. हल्ला कोणी आणि का केला अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा तपस सुरु आहे या घटनेने मात्र शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे..