पिंपरी चिंचवड* *आंबेडकरनगर झोपडपट्टी मधील प्रकल्प रद्द करावा :बाबा कांबळे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,८-६-२०२१. १९७२ पासून नेहरूनगरमधील डॉक्टर आंबेडकरनगर या झोपडपट्टीमध्ये तब्बल १३७ कुटुंब या भागात राहत असून २०१३ पासून येथील लोकांची फसवणूक चालू आहे.त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेतल्या फसवणूक करून हा पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र यात गोरगरीबाची फसवणूक असल्याने पुनर्वसन प्रकल्प रद्द करावा अशी मागणी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, यांनी केली.

आंबेडकर नगर समतीचे अध्यक्ष उमेश बनसोडे, अर्जुन गायकवाड, संमुख आईगोळे, बसवराज आईगोळे, परशुराम आइगोळे, संतोष पुजारी, इब्राहीम शेख, सिद्धू पुजारी सैपान शेख, सुधीर सोनवणे, बादशहा शेख, राजेश आइगोळे, आदी उपस्थित होते. ‘सदर प्रकल्प रद्द व्हावा यासाठी आयुक्त आणि एसआरऐ चे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

संबंधित बिल्डरच्यावतीने बेकायदेशीरपणे ट्रांजेक्शन कॅम्प मध्ये हालवण्यासाठी आणि घर खाली करून घेण्यासाठी येथील रहिवाशांना जबरदस्ती करून बाळाचा धाक दाखवून दादागिरी करून त्यांना त्या ठिकणाहून हलवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *