पिंपरी चिंचवड महानगरपालिकचे सर्व स्थायीचे सदस्य धास्तावले ; एसीबीने बोलवण पाठवले आहे.
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,२४.९.२०२१.
पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी चिंचवड महापालिकेत उघडकीस आलेल्या टक्केवारी तथा लाचखोरी प्रकरणात आता स्थायी समितीच्या इतर सर्व १५. सदस्यांची चौकशी एसीबी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे. त्यासाठी एसीबीने समजपत्र नुकतेच (दिनांक, २०) त्यांना बजावले. त्यामुळे भाजपच नाही, तर विरोधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटातही खळबळ उडाली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व स्थायी समिती ( सदस्यांवर ही नामुष्कीची पाळी आली आहे.
प्रत्येक सदस्यांच्या नावे त्यांच्या राहत्या घराच्या पत्यावर हे समजपत्र तथा चौकशीची नोटीस देण्यात आली आहे. त्यात एसीबीच्या पुणे कार्यालयात २१.ते २९. सप्टेंबरपर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत नोटीसीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून या, असे बजावण्यात आले आहे. आम्ही नऊ सदस्य बहूदा एकत्रित जाऊ, असे भाजपच्या एका सदस्यांने सांगितले.