पुणे* *मार्केटयार्ड मधील बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह रेल्वे रुळावर

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२४.९.२०२१.
पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर वसाहतीून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह हडपसर येथील रेल्वे रुळावर आढळून आला आहे. प्रतिमा भास्कर कुटगे (वय २२, रा. आंबेडकरनगर) असे या तरुणीचे नाव आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिस तिचा शोध घेत होते. परंतू संबंधीत वर्णणाची एक तरुणी हडपसर येथील रेल्वे रुळावर मृत अवस्थेत मिळून आली
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री उशीरापर्यंत वाट पाहून देखील ती घरी परतली नाही. नातेवाईकांनी इतर ठिकाणी चौकशी केली. मात्र तीचा पत्ता लागला नाही. शेवटी नातेवाईकांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात रात्री उशीरा धाव घेत प्रतिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती,
पोलिसांनी तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला. अधिक चौकशीसाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. प्रतिमा घरातून गेल्यानंतर ती रेल्वे रुळापर्यंत कशी पोहचली. तिच्यासोबत कोणी होते का? याचा तपास पोलिस करत आहेत.