मराठी
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का /आमदार लक्ष्मण जगतापांचे कट्टर समर्थक अरुण पवार, विष्णू शेळकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,२४.९.२०२१.
पिंपरी-चिंचवड, शहर, जिल्हा, २३ सप्टेंबर | आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘गळती’ सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. आज भाजप पदाधिकारी आणि मराठवाडा जनसंघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजप सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशी भाजप युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.