कै.उल्हास साठे क्रीडा प्रतिष्ठान पिंपळे गुरव च्या वतीने लांडेवाडी, येथे निमंत्रित मुष्टियुद्ध स्पर्धा संपन्न!

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२७.९.२०२१.
कै. उल्हास साठे,
क्रीडा प्रतिष्ठान पिंपळे गुरव च्या वतीने लांडेवाडी, येथे निमंत्रित मुष्टियुद्ध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये आशिष उबाळे, पुणे महानगरपालिका खेळाडू यास ब्रेस्ट बॉक्सर हा बहुमान देण्यात आला यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय मुष्टियोद्धा फिरोज खान, यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये बेस्ट बॉक्सर हा बहुमान माननीय अजित सिंग कोचर आंतरराष्ट्रीय कोच व दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी विजेते स्पर्धक सचिन शिंदे, आशिष उबाळे, रविराज महापुरे, कैलास कांबळे, निखिल गुजर, करण कणसे, जय कुमार परदेशी,शकील शेख, रोहित सावंत,रमेश कांबळे,सुजय गायकवाड,प्रेम किरण जाधव, रघुनाथ वाडेकर, जीवन सोनकांबळे, प्रवीण कलापुरे, निशिकांत भोसले,रवी देशपांडे, अमित काटे,अमोल कटाळे,वैभव साबळे, प्रणव कांबळे,अनिकेत शिंदे,या स्पर्धकाने आपल्या गटांमध्ये विजेतेपद मिळवले.