पुणे,दुकाने उघडी ठेवण्याबाबत व्यापारी ठाम पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची प्रतीक्षा

*पुणे,दुकाने उघडी ठेवण्याबाबत व्यापारी ठाम पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची प्रतीक्षा*
संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,६-८-२०२१.
पुणे : करोना र्निबधांनुसार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असले तरीही शहरातील व्यापारी सायंकाळपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात ठाम आहेत. त्यामुळे दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवून व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवून दिली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय होण्याची प्रतीक्षा असून सोमवापर्यंत (९ ऑगस्ट) दुकाने चारनंतर उघडी ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार,आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, यांची भेट घेतली.