पुण्यात २. वर्षांच्या मुलासह आईने मारली विहिरीत उडी…

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१३.९.२०२१.
पुणे : विहिरीत एक महिला आणि मुलाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ते मृतदेह कविता आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा असल्याची खात्री पोलिसांनी पटवली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
कविता या मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी हडपसर, पोलिसांत दिली होती. तांत्रिक तपासात कविता म्हातोबाची आळंदी परिसरात असल्याची माहिती समजली. त्यानंतर लोणी काळभोर,आणि हडपसर पोलिसांनी शोध सुरू केला.दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून महिलेने आत्महत्या केली. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यालगत असलेल्या म्हातोबाची आळंदी, परिसरात घडली.
कविता देवीदास भोसले (३०, सध्या रा. भेकराईनगर. मूळ उमरगा, जि. उस्मानाबाद) आणि दोन वर्षांचा मुलगा प्रणित अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed