पिंपरी चिंचवड* *आमदार मा. लक्ष्मण जगताप, यांच्या हस्ते रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,१५.९ .२०२१.
आमदार मा. लक्ष्मण जगताप, यांच्या हस्ते रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप
वर्षभरापासून करोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले
चिंचवड :- कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रिक्षा व वाहन चालक यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.मदतीचा हात म्हणून (दि.१३) रोजी चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार मा. लक्ष्मण भाऊ जगताप,व महापौर माई ढोरे, यांच्या हस्ते सांगवी, येथील बॅडमिंटन हॉल पी डब्ल्यू डी ग्राउंड येथे रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
.यावेळी आमदार जगताप, म्हणाले,मागील वर्षभरापासून करोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये रिक्षाव्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता येत गेल्यानंतर रस्त्यावर रिक्षा धावू लागल्या. मात्र, ‘वर्क फॉर्म होम’ तसेच करोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करणे टाळत असल्याने प्रवासी मिळेनासे झाले. त्यात बरेच दिवस सर्वसामान्यांसाठी लोकलसेवादेखील बंद असल्याने याचाही फटका रिक्षाचालकांना बसला होता.