विशेष पोस्ट
पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे, चौकशीत दोषी; तात्काळ बदली

संवाददाता, सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक.१५.९.२०२१.
पारनेर : लोकसेवकपदाचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या पारनेरच्या (जि. नगर) तहसीलदार ज्योती देवरे या चौकशीत दोषी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पण देवरे, यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
पदाचा गैरवापर करून वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशिन जप्त केल्यानंतर तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे असे विविध आरोप तहसीलदार ज्योती देवरे, यांच्यावर आहेत. अशा विविध प्रकारे देवरे, यांनी ५.कोटी ९४. लाख ९६. हजार ७२. रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे ३०.ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती.