पिंपरी चिंचवड* *मेट्रो आमच्या हक्काची “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” याच नावाने ओळखली पाहिजे

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,७-९-२०२१.
मेट्रो आमच्या हक्काची आणि ती “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” याच नावाने ओळखली गेली पाहिजे
आज पिंपरी चिंचवड शहरात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, व शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे,यांच्या नेतृत्वात शहरात पुणे मेट्रोच्या विरोधात निर्णयकारक आंदोलन करण्यात आले. आज मेट्रोच्या खांबावर “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे स्टिकर चिटकवण्यात आले. तुम्ही नाव बदल करण्यात चालढकल करत असाल तर आम्हाला कळवा आम्ही ते बदलवून घेऊ, पण खपवून घेणार नाही.
नेहमी कश्या ना कश्या प्रकारे आमच्या शहरावर होणारा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा, त्याला काही मर्यादा असतात. आता या मर्यादा तोडुन आपल्या शहरातील युवक पेटून उठलेला आहे आणि यापुढे अन्याय सहन करणारच नाही.