मराठी
पिंपरी चिंचवड* *मुलीचे लग्न माझ्याशिवाय कोणाशी जमवले तर त्याला मी मारून टाकीन…

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,७-९-२०२१.
तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशिवाय इतर कोणाशी जमवले तर त्याला आणि तुम्हालाही मारून टाकीन’; तरुणाची अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना धमकी मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून आरोपी अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत होता. फिर्यादी महिला व त्यांचे पती हे नातेवाईकांसह थांबले असताना आरोपी तेथे आला. फिर्यादी महिलेच्या मुलीशी मी लग्न करणार आहे. भविष्यात हिचे लग्न जमू देणार नाही, असे आरोपी बोलला. असे का बोलतोस, असा जाब फिर्यादी व त्यांच्या पतीने आरोपीला विचारला असता ‘तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशिवाय इतर कोणाशी जमवले तर त्याला मी मारून टाकीन व तुझ्या घरच्यांनाही मारून टाकीन’, अशी धमकी देऊन आरोपीने शिवीगाळ केली.