पुण्यात मुलींनीच केले*,*आईला ब्लॅकमेल* *व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी

*पुण्यात मुलींनीच केले*,*आईला ब्लॅकमेल*
*व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी*
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,७-९-२०२१.
पुणे : आईचं परपुरुषासोबतचं प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी मुलीनं स्वतःच्या आईचं व्हॉट्सअॅप हॅक केलं. त्यावेळी तिला दोघांत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. सोबतच तिला आपल्या आईचे प्रियकरासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील मिळाले. पुण्यातील एका २१. वर्षीय तरुणीनं आपल्या आईचे प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
एका व्यक्तीचं आपल्या आईसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा सुगावा लागल्यानंतर आरोपी तरुणीनं आपल्या आईचं व्हॉट्सअॅप हॅक केलं आहे. यानंतर आईचे आणि तिच्या प्रियकराचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५. लाख रुपयांची खंडणी मागणी केली होती. पण आईच्या प्रियकरानं पोलिसांत तक्रार दिल्यानं मुलीचा भांडाफोड झाला आहे.