मराठी
पुण्यात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठ तुडुंब गर्दी

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,७-९-२०२१.
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोना नियमांना पायदळी तुडवण्याबरोबरच लोकांच्या मनातून भीती पूर्णपणे गेल्याचे चित्र दिसून येत आहे. पाच दिवसात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. शहरात घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झालीये. त्यानिमित्ताने पुणे शहरातल्या रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर अशा मध्यवर्ती भागात गौरी – गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. आज रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. नागरिक पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार असल्याचे चित्रही सध्यस्थितीत दिसू लागले आहे.