बोपखेल गावातील मुठा नदीवरील विसर्जन घाटावर अनंतचतुर्दशीच्या दिवशी कार्य तत्पर असणारे पोलीस बांधव व मनपा कर्मचाऱ्यांचा शिवसेना शाखा बोपखेलच्यावतीने कोरोना योध्दा प्रमाणपत्र, शाल व गणपती स्तोत्र पुस्तक देऊन मान सन्मान करण्यात आला-श्री. भाग्यदेव घुले

*बोपखेल गावातील मुठा नदीवरील विसर्जन घाटावर अनंतचतुर्दशीच्या दिवशी कार्य तत्पर
संवाददाता तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२०.९.२०२१.
घरसंसार, कार्यक्रम बाजूला ठेवून कोरोनाचे सावट डोक्यावर असताना बोपखेल, गावात विसर्जन घाटावर बारातासापेक्षा जास्त वेळ कार्यतत्पर असणारे पोलीस बांधव श्री. आदित्य शिंदेसाहेब तसेच मनपा कर्मचाऱ्यांमध्ये श्री.हनुमंत देवकर, श्री. राजू बारसे, श्री.विकी डिल्लोर,यांचा कोरोना योध्दा प्रमाणपत्र, शाल, गणेशस्तोत्र पुस्तक देऊन मान सन्मान करण्यात आला. यावेळेस शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. नामदेव घुले, तसेच ह.भ.प. श्री.विठ्ठल महाराज घुले,(विणेकरी), ह.भ.प. श्री. बबनभाऊ घुले, श्री.मारूती मोरे, श्री.दत्तात्रय बाळु घुले, श्री. दत्ताभाऊ घुले, श्री.रोहिदास जोशी, श्री. प्रल्हाद घुले,श्री. मनोज गायकवाड, उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिवसैनिक श्री. भाग्यदेव घुले,व शिवसेना शाखाप्रमुख श्री. संतोष गायकवाड, यांनी केले होते.