मराठी
चाकणमध्ये १२. वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२०.९.२०२१.
लैंगिक अत्याचारातुन मुलीने दिला मुलाला जन्म चाकण, परिसरात खळबळ दोन तरुणांवर गुन्हा दाखल एका तरुणास अटक एकजण फरार आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी. चाकण, अल्पवयीन मुलीला एकटे गाठून तिच्या वर जबरदस्तीने वेळी वेळी केलेल्या बलात्कारातुन एक १२. वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असुन तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे, याप्रकरणी चाकण, पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारी वरुन दोन जणांच्या विरोधात चाकण पोलीस स्टेशन मध्ये बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली असून एकजन अद्याप फरार आहे.