नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय गांधीवादी नेता

मी (नेल्सन मंडेला ) राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळचे असलेल्या माझ्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो.. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि सर्वांना जेवणाची ऑर्डर दिली.. काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला.. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एक व्यक्तीकडे गेले.. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो वाट पाहत होता.. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले.. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला आणि लगेच खायला सुरुवात केली.. जेवत असताना त्याचे हात सतत थरथरत होते.. तरीही त्याने पटापट जेवण केले आणि आमचे जेवण संपायच्या आत तो तिथून निघून गेला..
तो गेल्यानंतर माझा सहकारी मला म्हणाला, “तुम्ही पाहिलंत का त्याला? तो बराच आजारी वाटत होता.. त्याच्या हातापायात मुळीच त्राण नव्हते.. जेवताना त्याचे हात सतत थरथरत होते..!”
मी म्हणालो, “नाही ते तसे नाही.. आंदोलन काळात मी जेव्हा तुरुंगात होतो, तेंव्हा मला ज्या बराकीत ठेवले होते तिथे हा सुरक्षा रक्षक होता.. माझा छळ करणे हे त्याच्यासाठी नित्याचीच बाब होती.. मी काकुळतीला येऊन जेव्हा पाणी मागायचो तेव्हा हा यायचा आणि कुत्सितपणे हसत माझ्या तोंडावर लघवी करून जायचा.. आता राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मी ही त्याला बोलावून त्याच्याबरोबर तसाच व्यवहार करतो की काय? या भीतीने तो थरथर कापत होता..!!
मला संधी होती पण ते माझ्या नैतिकेत बसत नाही.. सूड आणि द्वेषाची भावना राष्ट्राला विनाशाकडे घेऊन जाते तर “सहनशीलता” राष्ट्र उभारणीला पोषक ठरते..!!