मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ कार्यान्वित करा

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक.१७-९-२०२१.
पिंपरी
वाढते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी मुंबई- पुणे द्रूतगती महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ तात्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील, यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड,यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहरांना जोडणाऱ्या सुमारे ९४.५. किमी द्रूतगती महामार्गावरुन दिवसाला सरासरी ६०. हजार वाहने प्रवास करतात. या मार्गावरील वाहतुकीसाठी अनेक नियम घालून दिलेले आहेत. पण, त्याचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.