तुमच मिटत नसेल तर मला उपमुख्यमंत्री करा -मा प्रसाद खामकर यांच राज्यपालांना साकडं

संवाददाता ब्रिजेश बडगुजर: तुमच मिटत नसेल तर मला उपमुख्यमंत्री करा”-मा प्रसाद खामकर यांच राज्यपालांना साकडं* महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून कित्येक दिवसांचा अवधी लोटला आहे ,राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिले आहे ,पण अजूनही राज्यात सरकार स्थापन करण्यावर भाजपा , शिवसेना यांच्यामध्ये तोडगा निघालेला नाहीय ,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावरून सध्या दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे , सरकार स्थापन न झाल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे ,परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवाचे प्रचंड नुकसान झाले आहे , शेतकऱ्यांची जवीत व वित्तहानी झाली आहे ,सरकारने अजूनही कोणत्या प्रकारचे नुकसान पंचनामे केलेले नाहीत ,शेतकरी वर्गाचे प्रचंड हाल सुरू आहेत , याच चाललेल्या पार्श्वभूमीवर आज *पारनेर नगर मतदारसंघाचे माजी उमेदवार मा प्रसाद खामकर* यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या स्वीय सहायक यांना भेटून राज्यपालांच्या नावे पत्र देऊन , महाराष्ट्र राज्याचे सरकार स्थापन होण्याच्या कालावधी पर्यंत उपमुख्यमंत्री पदी प्रसाद खामकर यांची नेमणूक करावी अशी विनंती केली आहे , मा खामकर यांनी त्या पत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा आणि शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला दिलेलया पत्रात केला आहे ! पत्रकारबांधवांनी मा.खामकर यांना संपर्क केला असता , “राज्यात सरकार स्थापनेत अस्थिरता निर्माण झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गावर होणारा अन्याय व त्यांचं दुःख न पाहवल्यामुळं आपण हा निर्णय घेत आहोत ,माझी मा राज्यपाल यांची फोन वर चर्चा झाली असून मला लवकरच उपमुख्यमंत्री पदग्रहण करण्यासाठी मा. राज्यपाल महोदय बोलवतील असा विश्वासही मा खामकर यांनी व्यक्त केला