बोपखेलगाव शिवसेना शाखेच्या वतीने औषधे फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना “कोविड योध्दा” म्हणून सन्मानपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,९-९-२०२१.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील
बोपखेल, (रामनगर- गणेशनगर) भागात पावसाचे प्रमाण सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला होता, त्यामुळे थंडी वाजून येणे, ताप येणे, अंग व डोके दुखणे तसेच डेंगू, मलेरिया साथीचा फैलाव होत होता. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागा मार्फत योग्य ती खबरदारी घेतली जावी म्हणून शिवसैनिक श्री. भाग्यदेव घुले, यांनी शिवसेनेच्या माध्यमातून महापालिकच्यावतीने धूर फवारणी, औषध फवारणी करण्यात यावी म्हणून मागणी केली होती त्यानुसार दर शनिवारी बोपखेल-रामनगर-गणेशनगर या तीनही विभागात तीन गाड्या व कर्मचारी वर्ग पाठवण्यात येत असून या सर्व कर्मचाऱ्यांना शिवसेना शाखेच्या वतीने “कोविड योद्धा” म्हणून सन्मानपत्रक देण्यात आले.
यावेळी शिवसैनिक श्री. भाग्यदेव घुले, श्री. नामदेव घुले(उपविभाग प्रमुख), श्री. संतोष गायकवाड(शाखाप्रमुख) तसेच श्री. रोहिदास जोशी, श्री. दत्तात्रय घुले श्री. चेतन दादा घुले, कु. अमित टिळेकर, व व्यापारी वर्गातील अहमदभाई, आरिफभाई, मांगिलालशेठ, चौधरी, हे उपस्थित होते.