मधुमेह* , *उच्च* *रक्तदाब* , *हृदयरोग* *याविषयी,पार पडले* *आरोग्य* *शिबिर* … *सुमारे* ८०. *पेक्षा* *अधिक* *रुग्णांची* *झाली *तपासणी* व *औषध* *उपचार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१०-९-२०२१.
महादेव कोळी, चौथरा, अभिवादन दिनानिमित्त डॉ. शेखर बेंद्रे, आरोग्य केंद्र,म्हाळुंगे, तर्फे आंबेगाव व किसान सभा,आंबेगाव तालुका, समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते…
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण-म्हाळुंगे या दुर्गम भागात, दर रविवारी डॉ.शेखर बेंद्रे, आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य सेवा दिली जाते…
या आरोग्य केंद्रात, विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर सेवाभावी वृत्तीने येऊन,रुग्णांची तपासणी करून,योग्य ते उपचार करतात.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात अलीकडील काळात मधुमेह, उच्चरक्तदाब व ह्रदयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत…
या अनुषंगाने या आजारांच्या विषयी विशेष आरोग्य शिबिर नुकतेच डॉ. शेखर बेंद्रे, आरोग्य केंद्र येथे पार पडले ….
या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. किशोर खिल्लारे, व डॉ.अक्षय शेवाळे, यांनी सुमारे ८०. पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले…
या सर्व रुग्णांची साखर व बीपी तपासून त्यांच्या आजाराचे निदान करण्यात आले,व उपस्थित रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आला..
यावेळी एकून ८०. रुग्णांपैकी 45 रुग्ण हे मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारांनी अगोदरपासूनच ग्रस्थ होते,त्यांना योग्य ते उपचार यावेळी करण्यात आले,तर १०. ते १२. नवीन मधुमेहाचे रुग्ण हे यावेळी आढळून आले…
या सर्व रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब व हृदयरोग आणि दमा या आजारांविषयी सोप्या भाषेमध्ये माहिती
डॉ. किशोर खिल्लारे, व डॉ. अक्षय शेवाळे, यांनी दिली….
या आजारापासून बचाव कसा करावा व कोणती काळजी घ्यावी याविषयाची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली….
आरोग्य शिबिरात रुग्णांची शुगर तपासणीचे काम पाटण-म्हाळुंगे येथील आरोग्य सेविका श्रीमती बागुल, मॅडम,आशा वर्कर संगीता वडेकर, व आदीम संस्थेच्या आरोग्य सेविका अर्चना गवारी यांनी केले..
या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. संगीता वडेकर, किसान सभेचे तालुकाध्यक्ष कृष्णा वडेकर, डॉ. किशोर खिल्लारे, डॉ.अक्षय शेवाळे,दैनिक लोकमत व दैनिक प्रभात चे माजी संपादक व जेष्ठ लेखक श्री.महावीर जोंधळे,जेष्ठ लेखिका श्रीमती इंदुमती जोंधळे, प्रा.डॉ.आशा खिल्लारे, श्री.रघुनाथ पारधी,किसान सभा जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे,दत्ता मावळे, इ.उपस्थित होते…
या आरोग्य शिबिराचे संयोजन, किसान सभेचे अशोक पेकारी, अशोक जोशी, राजु घोडे, लक्ष्मण मावळे, दत्ता गिरंगे,हिरा पारधी,अविनाश गवारी,दीपक कोबल,यांनी केले…..