मराठी
पिंपरी-चिंचवडच्या भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गप्प का ? – संजोग वाघेरे पाटील

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१५.९.२०२१.
पिंपरी चिंचवड गल्ली ते दिल्ली सर्वच ठिकाणी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या राजकीय पोळ्या भाजणारा पक्ष, अशी ओळख भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. खोटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम पाच वर्षांपूर्वी भाजपच्या नेते मंडळींनी केले होते.
परंतु भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर भाजपला आपली नैतिकता आठवली नाही. पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी भाजपच्या या भ्रष्टाचारावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, आणि चंद्रकांत पाटील, गप्प का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. संजोग वाघेरे पाटील, यांनी उपस्थित केला आहे.