पुणे उद्योजक गौतम पाषाणकर, यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१५.९.२०२१.
पुणे : खराडी येथील ‘प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन’मधील सी बिल्डिंगमध्ये पी १०१. व १०२.या सदनिकांची खरेदी करण्याचे ठरविले. त्यांची दोन कोटी ८७. लाख रुपये किंमत ठरविण्यात आली. तसा लेखी करारनामा करण्यात आला. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून दोन कोटी ४०. लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्यांनी मिळकतीचा ताबा व नोंदणीकृत दस्त न करता पी १०२. या सदनिकेचे खरेदीखत सुशील झोररतर्फे कुलमुख्यत्यार म्हणून मनीषा गोदर (रा. रेंजहिल्स) व पी १०१. ही सदनिका गणेश शिंदे (रा. वडगाव शेरी) यांच्या नावावर करून दिली.
यांच्यासह तिघांवर दोन कोटी ४०. लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात बांधकाम व्यवसायात तोटा झाल्याने देणेकऱ्यांच्या तगाद्याला वैतागून गौतम पाषाणकर, यांनी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडल्याने एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed