मराठी
स्वच्छता कर्मचारी ( स्वच्छताधूत ) यांच्या शुभ हास्ते श्रींची आरती …!!

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.१५.९.२०२१.
दिघी -: पावसळा , हिवाळा , उन्हाळा आसो वा मोठा सण असो कधीही सुट्टी न घेता आपल्या गावातील व प्रभागातील परिसराची स्वच्छता नियमित करुन नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेतात ..!!
करोना काळातही आपली व आपल्या कुटूंबाची काळजी न करता विविध भागात वेळो वेळी जंतूनाशक फवारणी करुन खर्या अर्थाने नागरिकांचे रोगापासुन रक्षण केले आहे.
यानिमित्तानेच स्वच्छताधूतांच्या शुभ हास्ते घुले, परिवाराच्या श्रीमंत दगडू शेठ गणपतीची आरती करण्यात आली ..!
यावेळी या कर्मचार्यांनी दिघी हे स्वच्छ गाव .., सुंदर गाव .., व येथील नागरिक सदैव निरोगी व आनंदी राहो अशी गणराया चरणी प्रार्थना करण्यात आली …!