मराठी
आशा सेविका, गटप्रवर्तकांना रखडलेली मानधनवाढ व कोरोना* *प्रोत्साहन भत्ता तात्काळ द्या – मा.महेश लांडगे

*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांना मागणीचे निवेदन*
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१४.९.२०२१.
कोरोना नियंत्रणासाठी आपल्या सुचनेनुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वकांक्षी योजना राबविण्यात आली. ही योजना आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या साहाय्याने यशस्वी करण्यात आली. मात्र या योजनेत सहभागी होणाऱ्या ७२. हजार आशा सेविका व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने मानधनवाढ व कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्याप दिला नाही. याबाबत राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच, आशा सेविकांचे थकीत मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार मा.महेश लांडगे, यांनी केली आहे.