मराठी
पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, यांची रायगड येथे बदली…

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,३-९-२०२१.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये २५. मे २०१८.रोजी शिंदे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर काही दिवस रजेवर असल्याने त्यांनी कार्यालयीन कामकाज केले नाही. २.जून २०१८.पासून त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून कामास सुरूवात केली. सुरूवातीला त्यांनी महापालिकेच्या शाळा सुधारणा तसेच पटसंख्या वाढीवर लक्ष केंद्रीत केले. तसेच विविध उपक्रम राबवत शाळांचा दर्जा सुधारविण्यासाठी प्रयत्न केले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्राथमिक विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, यांची रायगड या ठिकाणी बदली झाली आहे.