पुणे* *आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगला भुर्दंड बसणार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,४-९-२०२१.
पुणे : वाहन पकडल्यानंतर तुम्ही फाइन भरला की पोलिस लगेचच तुमचे वाहन सोडून देतात. परंतु कोटार्चे तसे नाही. कोर्टात फाइन भरण्यासाठी प्रसंगी एक पूर्ण दिवस लागतो किंवा अनेक तारखांवर हजर राहावे लागते. कोर्टात फाइन भरल्यानंतर लगेचच वाहन सोडण्यात येत नाही. त्यासाठी भरपूर कागदपत्र, अर्ज भरावे लागतात. त्यामुळे लोकांना अनेकदा कोर्टात चकरा माराव्या लागतात. लोकांना जोवर कोटार्चे झटके आणि फेऱ्या माराव्या लागणार नाही, तोपर्यंत सतत वाहतूक नियम मोडणारे लोक सुधरणार नाही.
नव्या कायद्यानुसार आता प्रत्येक वाहतूक पोलिसाला मायक्रोचीप लायसन्स रिडर मशिन्स देण्यात आल्या आहे. या मशिन्समध्ये प्रत्येक वाहन चालकाचे स्मार्टकार्ड लायसन्स आणि वाहनाचे आरसी कार्ड स्कॅन करण्याची सुविधा आहे. त्यामुळे तुमचे वाहन देशभरात कुठे, कितीवेळा आणि कशासाठी चालान झाले याची माहिती देशात कुठेही मिळू शकेल.