राज्यातील कुस्ती पटूना आर्थिक सहाय्य करुन मैदाने सुरू करा.. आमदार मा. महेश लांडगे, यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१६.९.२०२१.
पिंपरी कोरोना काळात राज्यातील कुस्ती आखाडे आणि मैदांनासह भरविण्यात येणाऱ्या स्पर्धा बंद आहेत, त्यामुळे कुस्ती पटूना आर्थिक फटका बसला आहे, महाराष्ट्र चा गौरव म्हणून ओळखली जाणारी कुस्ती सध्या आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील आखाडे सुरू करावेत तसेच कुस्ती पटूना आर्थिक सहाय्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार मा.महेश लांडगे यांनी केली आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की कोरोना महामारी मुळे सर्व च घटकातील नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे महाराष्ट्र ची गौरवशाली परंपरा असलेल्या कुस्ती लाही कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून टाळेबंदी चा सामाना करावा लागत आहे, यांसह यात्रा, जत्रा,उरुसातील मैदाने रद्द करण्यात आली आहेत, परिणामी कुस्ती पटू मल्लाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.