पुणे* *महापालिका* *प्रभाग क्रमांक ८.औंध-बोपोडी येथील

*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम*पुणे* *महानगरपालिका आयुक्त* *मा. विक्रम कुमार,यांची भेट*
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१६.९.२०२१. चिखलवाडी.येथे
पुणे महानगरपालिका आयुक्त मा.विक्रम कुमार
यांनी आज भेट दिली.सदर स्टेडियम मध्ये
उपमहापौर मा.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांच्या निधीतून विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत.तरी संबंधित स्टेडियम मध्ये काही विकासकामे निधीअभावी अपुरी राहिल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत उपमहापौरांनी योग्य ती माहिती दिली, व आयुक्तांनी संबंधित सर्व प्रशासनाला उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.तसेच पुण्यातील सर्वात मोठे
भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जनरल जोशी गेट जवळ येथे साकारण्यात येत आहे. याठिकाणी आयुक्तांनी भेट देऊन लवकरात लवकर तो प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक महोत्सव समिती अध्यक्ष व रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.परशुराम वाडेकर,
व पुणे मनपा संबंधित खात्याचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी वर्ग व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.