सांगवी बोपोडी या मुळा नदीवरील पुलाचे व जोड रस्त्याचे डिझाईन बदलुन … महापौरपदाला शोभेल असा प्रकल्प सांगवीकरांना द्यावा – प्रशांत शितोळे

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१९-६-२०२१.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महापौरांच्या प्रभागात निदान एक तरी प्रकल्प होऊ द्या अशी मागणी करणारे निवेदन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे की, सांगवी येथे मुळा नदीवर शितोळे परिवाराने खाजगीरित्या वाटाघाटी करून पूल बांधण्याची परवानगी दिल्याने महानगरपालिकेने या जागेतून पुलाला जोड रस्ता व पुढे पुणे मनपा हद्दीत शासकीय जागा घेऊन पुणे विद्यापीठालगत असणाऱ्या औंध -स्पायसर रस्त्याला जोडणारा रस्ता प्रस्तावित केला आह
आज हा प्रकल्प चालू होणार यासाठी समाधान आहे. परंतु अत्यंत साध्या पद्धतीने डिझाईन केलेल्या रस्ता व पुलाला आमचा अक्षेप असून त्याकरिता काही सूचना सुद्धा आहेत त्याची अंमलबजावणी आपणाकडून व्हावी व या करिता योग्य वाटल्यास सदर निविदा फेररचना होऊन पुन्हा करावी म्हणून विनंती आहे.