पुणे* *मनोरंजनळ* *कोरोना योद्धांच्या हस्ते प्रतिष्ठापना* *पूजा; मोरया मित्र मंडळाचा स्तुत्य शुभारंभ* *कर्वेनगर, पुणे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१२-९-२०२१.
मोरया मित्र मंडळ कर्वेनगर, पुणे, गणरायाची प्राण प्रतिष्ठापना बिंदुमाधव ठाकरे, रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावरील डॉक्टर मोनिका पवार,यांच्या हस्ते श्रींची आरती करून सोहळा संपन्न झाला. यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार मारणे, अध्यक्ष सागर शिगवण, अक्षय केसवड, गणेश गायकवाड, गजानन कड, ब्रह्मानंद टाक, मंगेश नवघणे, सुनील गोरे, दिलीप आहिरे, लताताई पवार,आदि उपस्थित होते.
यावेळी केदार मारणे म्हणाले मोरया मित्र मंडळाचे ब्रीदवाक्य आहे व्रत समाजसेवेचे माध्यम गणेशोत्सवाचे त्याला अनुसरून आत्ता पुर्ण देशावर करोना चे संकट असताना त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे एकच उपाय आहे गणपती विघ्नहर्ता आहे, तसंच आत्ता करोनाचे विघ्नहरण करायची असेल तर तसे करणे गरजेचे आहे आणि ते लसीकरण डॉक्टर पवार यांच्या मार्फत कर्वेनगर आणि कोथरूड भागात लसीकरण करण्यात येते तसेच त्यांच्यामार्फत जनजागृतीही करता येते हे त्यांचे कार्य मोलाचे आहे.