नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य तसेच टू व्हीलर लर्निंग लायसन्स चे वाटप

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी सम्पादक
पिंपरी चिंचवड़ महानगरपालिकेच्य
प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर, विद्यानगर, लाल टोपी नगर, इंदिरा नगर ,टिपू सुलतान नगर मोरवाडी, शाहूनगर ,संभाजीनगर या परिसरात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व वह्यांचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले, या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला, पाच हजार पेक्षा जास्त वह्यांचे वाटप प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन करण्यात आले ,त्याच बरोबर टू व्हीलर लर्निंग लायसन्स अत्यंत माफक दरात जवळजवळ दीडशे लोकांना देण्यात आले , वाढदिवसाच्या दिवशी सकाळी वृक्षारोपण, अनाथालय यांना मदत, वह्या वाटप व लर्निंग लायसन्स चे वाटप आदी उपक्रम करण्यात आले, याप्रसंगी अ प्रभाग अध्यक्ष ,नगरसेविका शर्मिला बाबर ,नगरसेविका कमलताई घोलप ,माजी उपमहापौर तुषारची हिंगे त्याच प्रमाणे प्रदेशाचे सचिव श्री अमित गोरखे,श्री बी के कोकाटे ,श्री सय्यद पटेल , RPI चे श्री दादा शिरोळे ,श्री राम शिरोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अजित भालेराव श्री संभाजी नाईकनवरे, श्री राम लोंढे, श्री अमोल कुचेकर, श्री मिलिंद कांबळे ,श्री नागेश राठोड,श्री विशाल पवार,श्री अविनाश शिंदे,श्री ओंकार गायकवाड श्री निलेश सोनावणे , श्री प्रशांत शिंदे ,श्री प्रीतम तेलंगे यांनी मेहनत घेतली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed