पिंपरी चिंचवड* *थेरगाव (डांगे चौक येथे भररस्त्यात युवकाची हत्या…

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,२५.९.२०२१.
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव डांगे चौकात रोहन कांबळे,नावाच्या युवकाचा मारेकऱ्यांनी खून केला. कंट्री वाईन शॉपच्या जवळील दुकाना समोर ही हत्या झालेली आहे. वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या आठ दिवसातील ही सातवी खुनाची घटना आहे. त्यामुळे एकूणच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे. हत्येच्या घटनांनी पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहर आज पुन्हा एकदा हादरलं आहे. कंट्री वाईन शॉपजवळील दुकाना समोर तरुणाची हत्या करण्यात आली. गेल्या आठ दिवसात शहरातील ही खुनाची सातवी घटना आहे.
वीरेंद्र यांना दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिणारे मित्र त्यांच्याकडे ये-जा करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांच्या एका मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. त्यामुळे मित्राने वीरेंद्र यांच्या घरी येऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला. वीरेंद्र यांची दारुच्या नशेत हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून आरोपी फरार झाले आहेत.