मराठी
राष्ट्रवादी* *कांग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते, मा.शरदचंद्र* *पवारांचा अनादर करणाऱ्या अध्यक्षांची दुकानदारी जनतेसमोर मांडणार

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,४-१०-२०२१.
राजगुरुनगर :
विविध प्रकारचा निधी देऊन सहकार्य करणारे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार यांना संस्थेच्या वार्षिक अहवालात टाळल्याचा आरोप करून खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार असल्याची टीका खेडचे राष्ट्रवादीचे आमदार मा.दिलीप मोहिते, यांनी केली.
लोकांच्या पैशावर उभारलेल्या संस्थेचे गेल्या ४७. वर्षात कोणतेही भरीव कार्य नाही. उलट मालकी हक्क असल्याचा आव आणून या माध्यमातून काहींचे प्रपंच सुरु आहेत. याविरोधात विधानसभेच्या येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.