मराठी
पिंपरी-चिंचवड शहरात मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना..

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,६-९-२०२१.
पिंपरी : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. ४०. वर्षीय नराधम बापाने १४. वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.