मराठी

पुण्यात दलित महिला सरपंचाला मारहाण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस चा नेता कोण

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,६-९-२०२१.
चित्रा वाघ …
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड, यांना मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ,(Chitra Wagh) यांनी ट्विटरवर घटनेविषयी संताप व्यक्त केला. हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे.
पुण्याजवळील कदमवाकवस्ती येथे लसीकरणाच्या श्रेयवादावरून शुक्रवारी ( दि. ४) सरपंच गौरी गायकवाड, गटाची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच यात सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button