गोरगरीबांवर उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राला देखील धर्मादाय रुग्णालये किंमत देई नाही, राज्यात चाललंय तरी काय?; आमदार मा.लक्ष्मण जगताप,यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केला संताप

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२३.९.२०२१.
पिंपरी, दि. २२ (पिंपरी चिंचवड ) – गंभीर आजार झालेल् पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील धर्मादाय रुग्णालये अक्षरशः फाट्यावर मारत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही रुग्णालये मुख्यंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याने आमदार लक्ष्मण जगताप, यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांना पत्र पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे. जर मुख्यमंत्र्यांच्याच पत्राला किंमत उरली नसेल, तर ही राज्यासाठी अतिशय लांच्छनास्पद बाब असल्याचे आमदार जगताप,यांनी पत्रात म्हटले आहे. अहो, मुख्यमंत्री महोदय राज्यातला कोणताही रुग्ण पैसे नाहीत म्हणून उपचाराविना आपला जिव सोडू नये यासाठी जरा गंभीर, व्हा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दाखल होणाऱ्या अर्जावर गांभीर्याने विचार करा तसेच राज्यातील धर्मादाय रुग्णालयांनी काय बाजार मांडलाय याकडेही जरा लक्ष द्या, अशी मागणी आमदार जगताप, यांनी केली आहे.