विशेष पोस्ट
आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या यशस्वी मध्यस्थीने … सेक्टर २३ ते डांगे चौक परिसरातील पाण्याच्या पाईपलाईनचे रखडलेले काम मार्गस्थ

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३१-७-२०२१
पिंपरी-चिंचवड मनपाच्या सेक्टर क्रमांक २३ जलशुद्धीकरण केंद्र पासून ते डांगे चौकापर्यंत जाणाऱ्या साडेसात किलोमीटरच्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम वाल्हेकरवाडी येथील शेतकरी वाल्हेकर व इतरानी मनपा सोबत जमीन मोबदल्याकरिता अडवले होते.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हे काम आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सदर शेतकऱ्याना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूसंपादनाबाबतचा व शेतकऱ्यांच्या समस्याचा विषय मार्गी लावून तातडीने काम करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या श्रीयुत लडकत व इतर अधिकाऱ्यांना दिले.