मराठी
१३. ऑक्टोंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थिती मध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन माजी महापौर आझम पानसरे, राजकारणात पुन्हा सक्रिय आगामी महापालिका निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी आमदार तसेच प्रमुख नेत्यांच्या बैठकीचा सपाटा सुरू

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,५-१०-२०२१.
पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे राजकीय प्रस्थ म्हणजे माजी महापौर आझम पानसरे, काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त झाले होते मात्र आता येणारी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी साठी पुन्हा ते सज्ज झाल्याचे पाहायला मिळात आहे, कारणं काही दिवसांपूर्वी माजी महापौर आझम पानसरे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांना भेटण्यासाठी उपस्थित होते त्याच्या बरोबर माजी आमदार विलास लांडे, पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे, माजी पक्षनेते जगदीश शेट्टी, आणि पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख मंडळ शरद पवारांच्या भेटीला गेले होते.