पिंपरी चिंचवड महानगरपालिका २०२२. निवडणूक त्रिसदस्यीय ऐवजी दोन सदस्य प्रभाग पद्धतीने घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची उपमुख्यमंत्री मा.अजित पवारांकडे मागणी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,३०.९.२०२१.
उपमुख्यमंत्री मा.अजित पवारांच्या भुमिकेकडे शहरवासीयांचे लागले लक्ष . त्रिसदस्यीय निर्णय अजुनही अधांतरी
आगामी काळात येणारी २०२२. ची पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक ही त्रिसदस्यीय होणार असल्याचे चित्र अजून तरी स्पष्ट झाले नाही, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, यांना महापालिका निवडणुकीत दोन सदस्य प्रभाग पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी केली आहे, याविषयी त्यांनी लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी चिंचवड शहरांत सध्या भाजप ची सत्ता प्रस्थापित आहे, त्यामध्ये येणार महापालिका निवडणुक ही त्रिसदस्यीय होणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे अनेक दिग्गज तळ्यात मळ्यात असलेले पहावयास मिळते विशेष म्हणजे महिला धोरण पाहता त्रिसदस्यीय प्रभागात एक जागा महिला उमेदवार साठी असणारं आहे मात्र पुढील दोन जागांसाठी पुरुष उमेदवार असणार आहेत.